कोल्हापूर : साकोली कॉर्नर येथील आर्या डेंटल क्लिनिकमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान व आधुनिक दंतवैद्यकीय उपकरणांसह नवीन सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. सुमारे २५ वर्षांचा अनुभव असलेले डॉ. पल्लवी मुग यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. ओजस शिवराज देसाई यांचीरुग्णांना आधुनिक व दर्जेदार दंतसेवा उपलब्ध होणार आहे.
या आधुनिक सुविधांचा शुभारंभ मा. आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या शुभहस्ते झाला. यावेळी डॉ. शिवराज देसाई, डॉ. सुनीता देसाई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची व ४०० हून अधिक डॉक्टर उपस्थित होते.
