कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ आज ठाकरे सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, आंदोलनापूर्वीच पोलिसांनी शिवसेना उपनेते संजय पवार, संपर्कप्रमुख विजय देवणे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील खराब रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांकडे सत्ताधारी मंडळी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत ठाकरे सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवण्याचा इशाराही देण्यात आला होता.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून शिवसेना उपनेते संजय पवार, संपर्कप्रमुख विजय देवणे यांच्यासह राजू यादव, पोपट दांगट, तानाजी आंग्रे, भीमराव पाटील, उदय सुतार, संजय जाधव, दिनेश साळुंखे, आदित्य कराड, विनोद खेत आदी पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रशासनाने नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या कारवाईमुळे आंदोलनाला सुरुवात होण्यापूर्व
